25+ varieties
10k+ visitors
WELCOME TO

Aamba Mahotsav 2025

India's most loved mango festival, bringing the finest Alphonso mangoes directly from the farms of Konkan.

Devgad Hapus
Premium variety
Ratnagiri
Sweet & juicy
Payri
Perfect for pulp
Kesar
Saffron delight
माहिती | आंबा महोत्सव २०२५

महोत्सव माहिती

शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित अस्सल कोकणी हापूसचा अनुभव

Farmer to consumer concept - Experience authentic Konkan Hapus

आंबा महोत्सव
शुद्ध / Pure

आमची संकल्पना

"आंबा महोत्सव" हा शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित आहे. सर्व आंबाप्रेमींना शेतकऱ्यांकडून थेट फळे खरेदी करण्याची संधी मिळावी हा यामागील उद्देश आहे. कोकणातील ३०-४० आंबा उत्पादक (शेतकरी) एकत्र येऊन महोत्सवात सहभागी होतात. ते सर्व आपापल्या बागेतील अस्सल हापूस घेऊन येतात. अशा प्रकारे पुणेकरांना एकाच विश्वासार्ह ठिकाणी खरा हापूस आणि पायरी खरेदी करण्याची संधी मिळते.

"Aamba Mahotsav" is based on the farmer-to-consumer concept. The aim is to provide mango lovers an opportunity to buy fruits directly from farmers. 30-40 mango producers from Konkan region come together at the festival. They bring authentic Hapus from their farms. Thus, Punekars get to buy real Hapus and Payri at one trustworthy place.

सातबारा उताऱ्यासह शेतकरी / Farmers with 7/12 Extract

नैसर्गिक

पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेले

सातबारा

प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा उतारा तपासला जातो

थेट विक्री

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री

विश्वासार्ह

पूर्णपणे विश्वासार्ह व्यवहार

पडताळणी प्रक्रिया

महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा "सातबारा" (७/१२ उतारा) असणे आवश्यक आहे. आम्ही स्वतः प्रत्येकाचा ७/१२ उतारा तपासतो जेणेकरून कोणतीही फसवणूक होणार नाही. तसेच "आंबे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेले असावेत" ही त्यांच्यासाठी एकमेव आवश्यक अट आहे.

Each farmer participating in the festival must have their "Satbara" (7/12 extract). We verify everyone's 7/12 extract ourselves to ensure no fraud. Also, "the mangoes should be grown naturally" is the only necessary condition for them.

सातबारा पडताळणी
सातबारा / 7/12

महोत्सव स्थळे

पुणे

बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
सकाळी १० - रात्री ९

चिंचवड

रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड
सकाळी १० - रात्री ९

नाशिक

नवीन महोत्सव स्थळ (लवकरच)
येणार आहे
महोत्सवातील उत्पादने
स्वादिष्ट / Delicious

महोत्सवातील आकर्षणे

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर आणि चिंचवडमध्ये रामकृष्ण मोरे सभागृह अशा दोन ठिकाणी आम्ही आंबा महोत्सव आयोजित करतो. येथे लोकांना प्रसिद्ध आंबा कुल्फी तसेच घरगुती पापड, पिठलं-भाकरी, लोणचे, मसाले इत्यादी उपलब्ध असतात. आंबा उत्पादक (शेतकरी) आणि महिला बचत गट यांना त्यांच्या उत्पादनांची योग्य किंमत मिळण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ मिळते.

In Pune at BalGandharva Rangmandir and in Chinchwad at RamKrushna More Sabhagruha, we organize our Aamba Mahotsav. Here people can enjoy famous mango kulfi as well as homemade papad, pithla-bhakri, pickles, masala etc. Mango farmers and Mahila Bachat Gat get the best platform to sell their products at fair prices.

उपलब्ध उत्पादने

आंबा कुल्फी
पिठलं-भाकरी
लोणचे
मसाले
पापड
आंबा पोळी
"शेतकरी, महिला बचत गट आणि ग्राहक या सर्वांसाठी हा महोत्सव वरदान ठरला आहे"
"This festival has proven to be a boon for farmers, women self-help groups, and customers alike"

शेतकऱ्यांसाठी लाभ

  • योग्य किंमत मिळते
  • थेट ग्राहकांपर्यंत पोहोच
  • बिचौलियांपासून सुटका
  • व्यापक बाजारपेठ

ग्राहकांसाठी लाभ

  • अस्सल हापूसची हमी
  • शेतकऱ्यांकडून थेट खरेदी
  • स्पर्धात्मक किंमती
  • विविध प्रकारचे आंबे