इतिहास
main-img

आपल्या या महोत्सवामुळे आंबा प्रेमींना थेट शेतकऱ्यांकडून आंबा विकत घेण्याची संधी उपलब्ध होते.

२००९ साली, मराठी ह्रदयसम्राट मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या एका भाषणातून प्रेरणा घेऊन आपले आयोजक श्री. रवि सहाणे यांनी पुण्यातील परप्रांतीय आंबे विक्री करणाऱ्या भैय्यांविरोधात आंदोलन छेडले, त्यातून लक्षात आले की ते देवगड रत्नागिरी च्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विक्री करत असत. यामुळे आपल्या महाराष्ट्रातील विशेषता आणि कोकणातील आंबा उत्पादकांचे प्रचंड नुकसान होत असे व त्याच बरोबर ग्राहकांचीही फसवणूक होत असे.

यामुळे त्यांनी थेट शेतकरी ते ग्राहक असा आंबा महोत्सव भरविण्याचे ठरविले आणि त्याचे 'महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव' असे नाव ठेवण्यात आले. २०१० पासून पुणे आणि चिंचवड मध्ये तब्बल २० वेळा आंबा महोत्सव भरविण्यात आला.

यात कोकणातील ३०-४० आंबा उत्पादक सहभाग घेतात त्याचबरोबर पुणे शहरातील महिला बचत गट सुद्धा यात सहभाग घेतात. नागरिकांना येथे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले रत्नागिरी आणि देवगड येथील हापूस आणि पायरी आंबे खरेदी करायची संधी मिळते. महोत्सवाचे यंदा ९ वे वर्ष असून यंदा पुणे, चिंचवड बरोबर नाशिक येथे ही आंबा महोत्सव भरविण्यात येणार आहे.