माहिती
main-img

आपल्या या महोत्सवामुळे आंबा प्रेमींना थेट शेतकऱ्यांकडून आंबा विकत घेण्याची संधी उपलब्ध होते.

हा 'आंबा महोत्सव' थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारीत असून कोकणातील ३०-४० आंबा शेतकरी एकत्र करून दरवर्षी आंबा महोत्सव भरविला जातो. यात आंबा उत्पादक आपल्या बागेतील आंबा थेट विक्रीसाठी महोत्सवात आणतात यामुळे आंबाप्रेमी नागरिकांना अस्सल हापूस आणि पायरी आंबा खरेदी करण्याची संधी प्राप्त होते.

येथे सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचे सात-बारा उतारा बघूनच त्यांना महोत्सवात सहभागी केले जाते. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे असावेत ही यातील प्रमुख अट असते.

पुणे शहरात बाल गंधर्व रंगमंदिर व चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृह येथे महोत्सव भरविला जातो. यात आंबा बरोबर लोणचे, मसाले, पापड, कुरडया तसेच आंबा कुल्फी ई. अनेक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. महोत्सवामुळे आंबा उत्पादकांना व महिला बचत गटांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होते.