वैशिष्ट्य
main-img

आपल्या या महोत्सवामुळे आंबा प्रेमींना थेट शेतकऱ्यांकडून आंबा विकत घेण्याची संधी उपलब्ध होते.

या आंबा महोत्सवाच्या उद्घाटन दिनी,लोकांना एकत्र आणून काहीतरी मनोरंजक करावे असा विचार आम्ही केला . म्हणून विशेषतः लहान मुलांसाठी "आंबा खा "ही स्पर्धा आम्ही आयोजित करत आलो. ही स्पर्धाच आमच्या उत्सवाचे खरे वैशिष्ट आहे.

आंब्याचा आनंद घेणारी छोटी मुले
स्पर्धेवर अनेक वृत्तपत्र प्रकाशित लेख

२०१० मध्ये "आंबा खा "स्पर्धा महाराष्ट्रात प्रथमच सुरु झाली. या स्पर्धे मध्ये २५-३० मुले सहभागी होतात आणि त्यांना प्रत्येकी २-३ आंबे दिली जातात. सहभागी स्पर्धकांना ही आंबे खाण्यासाठी २ मिनिट एवढा वेळ दिला जाईल. जो स्पर्धक सर्व प्रथम दिलेली आंबे खाणार तो विजेता म्हणून घोषित होणार. विजयी स्पर्धकाला आंब्याची एक पेटी भेट म्हणून दिली जाते.